मोगरे खुन प्रकरणी मुख्य संशयिताला हरियानातून अटक
मोगरे खुन प्रकरणी मुख्य संशयिताला हरियानातून अटकnnनाशिक : शहरnपाथर्डी फाटा येथील हॉटेल अंगणसमोर योगेश मोगरे यांचा चाकू भोसकून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयिताला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. मोगरे यांच्यावर गेल्या २३ मार्चला दोघा संशयितांनी प्राणघातक हल्ला केला होता. एका अल्पवयीन संशयितास दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती.nnया प्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुन, जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. घटनास्थळावर सीसीटीव्ही नसल्याने कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुन्हेशाखेच्या पथकाने पुरावे संकलित करीत संशयितांचा माग काढला. दोघांपैकी एका १७ वर्षीय संशयिताला हरियाणातील त्याच्या गावातून अटक केली . मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (रा. चुडाना, हरियाणा) याच्या मागावर दोन पथके होती. त्याला चुडाना (हरियाणा) या त्याच्या गावातून अटक करण्यात पथकाला यश आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक सूर्यवंशी, सोनवणे, उपनिरीक्षक पोपट करवाळ, गुलाब सोनार, राहुल पालखेडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
