डॉक्टरांकडून महिलेला लाखोंचा गंडा
डॉक्टरांकडून महिलेला लाखोंचा गंडाnनाशिक : शहरnमेडिकल सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे सांगून महिलेला बारा लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडत जागा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आडगाव व अहमदनगर जिल्ह्यातील दोघा डॉक्टरांवर आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव स्वामी समर्थनगर येथे राहणाऱ्या पुष्पा योगेश ठोके यांनी या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठोके यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव स्वामी समर्थ नगर येथे राहणाऱ्या डॉ. दिग्विजय प्रकाश अहिरराव व अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. राहुल सूर्यभान कांडेकरnयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी असलेल्या दोघा डॉक्टरांनी ठोके यांना मेडिकलnसुरू करण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायात बारा लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार ठोके यांनी नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधीत संशयितांकडे बारा लाख रुपयांचीnरक्कम जमा केली. पोलिसांत गुन्हा दाखल केला. संशयितांनी मेडिकल सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही . पैसे देण्यास टाळाटाळ केली म्हणून ठोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर तपास करत आहेत..nनाशिक : शहरnमेडिकल सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे सांगून महिलेला बारा लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडत जागा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आडगाव व अहमदनगर जिल्ह्यातील दोघा डॉक्टरांवर आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव स्वामी समर्थनगर येथे राहणाऱ्या पुष्पा योगेश ठोके यांनी या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठोके यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव स्वामी समर्थ नगर येथे राहणाऱ्या डॉ. दिग्विजय प्रकाश अहिरराव व अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. राहुल सूर्यभान कांडेकरnयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी असलेल्या दोघा डॉक्टरांनी ठोके यांना मेडिकलnसुरू करण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायात बारा लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार ठोके यांनी नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधीत संशयितांकडे बारा लाख रुपयांचीnरक्कम जमा केली. पोलिसांत गुन्हा दाखल केला. संशयितांनी मेडिकल सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही . पैसे देण्यास टाळाटाळ केली म्हणून ठोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर तपास करत आहेत..
