एकीच्या बळावरच कामगार आपले हक्क कायम अबाधित ठेऊ शकतात – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*
nnनाशिक : शहरnnआपले हक्क कायम अबाधित ठेवण्यासाठी कामगारांची एकजूट अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे आपले हक्क, कामाचे रक्षण करण्यासाठी एकजूट कायम ठेवावी असे आवाहन करत इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस व एचएएल कंपनी हा नाशिकचा अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.nnहिंद मजदुर सभेचा अमृत महोत्सवी सोहळा आज नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस जिमखाना मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.nnयावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, खासदार हेमंत गोडसे,हिंद मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंह सिद्धू , आयएसपी संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले, हिंद मजूर सभेचे अध्यक्ष शंकरराव साळवी,जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, आयएसपी मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, निमंत्रक कार्तिक डांगे, अविनाश देवरुखकर, संदीप व्यवहारे, माजी महापौर अशोक दिवे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, इंटकचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू देसले, आकाश छाजेड यांच्यासह हिंद मजूर संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.nnयावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात सध्या कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम होत आहे. कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून युनियनचे अस्तित्व कमी होत आहे. या कामगारांच्या हिताचे रक्षण हिंद मजदुर सभा करते आहे,संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद असून शेवटच्या श्वासापर्यंत छगन भुजबळ हा कामगारांच्या प्रश्नांसाठी कायम आपल्यासोबत राहील असे त्यांनी सांगितले.nnते म्हणाले की, नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये काम करणं ही येथील कामगारांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या समाजात कालही होती आणि आजही आहे. मजदुर संघ आणि प्रेस कामगारांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.nnते म्हणाले की, देशातील सर्वच क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शरद पवार साहेब करतात. देशातील कामगार आणि शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्याचे काम आम्ही सर्व शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. एकीच्या बळावरच काम केलं तरच आपले हक्क आणि कामाचे रक्षण केले जाऊ शकते तसेच न्यायही नक्कीच मिळतो. त्यामुळे कामगारांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.nnते म्हणाले की, इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस आणि एचएएल ही नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाच्या बाब आहे. सध्या अनेक कंपन्या या राज्याबाहेर जात आहे मात्र नाशिकच्या या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या नाही ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
