घरफोडी, दुचाकी व मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकिस
nnनाशिक : उपनगरnउपनगर पोलिसांनी चोरीस गेलेल्या गाडीचा शोध घेत असतांना संशयित ललित विजय जाधव ( वय २० रा. जेलरोड, ना. रोड ) त्यांचा सोबत असलेला विधी संघर्षीत बालक हे खाडाखोड केलेली नंबर प्लेटची दुचाकी चालवित असतांना पोलिसांना मिळून आले. पोलीसांनी संशयितांना थाबविण्याचा प्रयत्न केला असता . ते पळुन जाउ लागले त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत. त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची पल्सर मोसा. १३५ सी सी, काळ्या रंगाची दुचाकी बाबत विचारपुस केली असता. दुचाकी सम्राट सिग्नल जवळ, नाशिक-पुणारोड येथुन चोरी केल्याचे सांगितले. अंगझडती १४ ग्रॅम सोन्याचे दागिने मिळुन आले . सदरचे दागिने हे संशयित कार्तिक राजु साठे ( वय १९, रा. लॉखडे मळा, सायखेडा रोड, नारायण बापु नगर, जेलरोड, ना. रोड ), भु-या उर्फ गोरख गणेश चव्हाण (वय २४, रा. फिरस्ता) व एक विधीसंघर्षीत बालक यांनी मिळून श्री बंगलो, सहकार कॉलनी, टाकळी रोड या बंगल्यातुन घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संशयित यश विजय गायकवाड (वय १८, व्यवसाय चालक, रा. सर्वेश किराणा दुकाणाचे माघे, भालेराव माळा, जय भवानी रोड , बाळा उर्फ सचिन बाबुराव शिंदे ( वय-२२, व्यवसाय – मजुरी, रा. सुकदेव किराणा दुकानाचे बाजुर, वडारवाडी, देवळालीगांव, नाशिकरोड ), सोनु उर्फ दुर्गेश आमृतलाल विश्वकर्मा, (वय-२४, व्यवसाय पेंटींगचे कामे, रा. मुरलीधरनगर, सागर दोंदे याचे रूम मध्ये, चेहडी पम्पींग, सिन्नर फाटा, नाशिकरोड) न यांना अटक केली . त्यांचे कडुन चोरलेले चारही मोबाईल चोरी करण्यासाठी वापरलेल्या अॅक्टीवा स्कुटर दुचाकी सहतिन्ही गुन्हात एकुण १,लाख २७ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.nnसदरची कामगिरी उपनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली केली.
