August 7, 2026

नाशिक शहरातील दुचाकी चोरी करुन चैनस्नॅचिंग करणारे ०२ आरोपी जेरबंद ०७ चैन स्नॅचिंग चोरीचे गुन्हे उघडकीस

0

नाशिक शहरातील दुचाकी चोरी करुन चैनस्नॅचिंग करणारे ०२ आरोपी जेरबंद ०७ चैन स्नॅचिंग चोरीचे गुन्हे उघडकीसnगुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कामगिरीnnनाशिक : शहरnचैन स्नैचिंग करणारे चोरटे हे अमृतधाम पंचवटी येथे येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखा युनिट१ च्या पथकास मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीत चोरट्यांना ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क्र. १ चा अंमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख आदीच्या पथकाने अमृतधाम, पंचवटी येथे सापळा लावुन संशयित १) ओमकार नंदकिशोर बागोरे (वय २३, रा. औदुंबरनगर, प्लॉट नं. २, अमृतधाम पंचवटी, नाशिक) , दुसरा संशयित मुसा अय्युब सैय्यद (वय ३६, रा. ३३५, जामा मशिदी जवळ, मुस्लीम मोहल्ला, आडगाव, नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी चैनस्नचिंग व शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. नाशिक शहरातील म्हसरुळ २ गुन्हे, आडगाव २ , मुंबईनाका २ , अंबड १ आदी पोलिस ठाण्यातील ०७ चैनस्नचिंग चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. चैन स्नॅचिंग चोरी करतांना वापरलेल्या ०२ चोरीच्या दुचाकी गुन्हयाबाबत तपास चालू आहे.nचैनस्नॅचिंगच्या गुन्हयातील ०७ सोन्याच्या वेगवेगळ्या लगडी विविध वजनाच्या एकूण किंमत रुपये २ लाख ९० हजार . तसेच दोन मोटार सायकल किंमत रुपये १ लाख ३० हजार – रु. कि. च्या असा एकूण ४ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयितांना म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *