पोलिस आयुक्तालयात २१ चारचाकी वाहन दाखल
nnनाशिक : पोलिस आयुक्तालयnजिल्हा नियोजन समिती च्या निधीतून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयास २१ चारचाकी वाहन देण्यात आले आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शनिवारी (दि ८) पोलीस आयुक्त नाशिक याच्या कार्यालयीन प्रांगणात करण्यात आले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. हिरवा झेंडा दाखवत नवीन वाहने पोलिस आयुक्तालयात दाखल झाली. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आमदार प्रा देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे , गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ १ उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ उपायुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी आदीसह सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमंलदार उपस्थित होते.
