August 7, 2026

मडबाथ अर्थात माती स्नानचे  आयोजन

0

 nnनाशिक : शहरnn nnमडबाथ अर्थात माती स्नानचे  आयोजन नंदिनी डेअरी फार्म येथे  करण्यात आले होते . संगीताच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला. महेश शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २६ वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोरोना नंतर यंदा पुन्हा आयोजन करण्यात आले होते. हजारो नाशिककरांनी मडबाथचा आनंद घेतला. हनुमानजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सकाळी ५ : ४५ वाजेपासून हा कार्यक्रम सुरु झाला. फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता. त्यात चिखल होता. या टबमध्ये २५ ते ३० लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते. माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल, प्रदीप पाटील, एड.धर्मेंद्र चव्हाण डॉ.ज्ञानेश्वर चोपडे, वैभव शेटे, अमित घुगे , योगेश कमोद, किशोर बेलसरे, संदीप जाधव,विजय पाटील,मनोज देसाई,गौरव देसाई,यश देसाई,नंदू पाटील,विशाल पाटील आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रूप, जल्लोष ग्रूप,पंचवटी व्यापारी ग्रूप, नाशिक इको ड्राईव्ह, चामरलेणी इको ड्राईव्ह, मुंबई ग्रुप आदी ग्रुपचे सदस्य आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *