गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटकnखंडणी विरोधी पथकाची कामगिरीnnनाशिक : शहरnnखंडणी विरोधी पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा पथकास गुप्त माहिती मिळाली होती. नाशिक पोलीस आयुक्तालय हददीतील एक्सलो पॉईन्ट, दातीर नगर, अंबड, नशिक येथे एक इसम गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी व पथकातील अंमलदार यांनी केदारनाथ ट्रान्सपोर्ट जवळील पुलाजवळ, दातीर नगर, नाशिक येथे सापळा रचत संशयित मयुर रामदास गांगुर्डे, (वय २८ वर्षे, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. सुयोग अपार्टमेंट, रुम नंबर १, कमल स्वीट समोर, दातीर नगर, अंबड लिंक रोड, नाशिक ) यास ताब्यात घेतले असता. अंगझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) मॅझीन व त्यात दोन जिवंत काडतुस असा एकुण ३१ हजार रूपये किंमतीचा. चा मुद्देमाल मिळुन आला. सदरचे देशी बनावटीचे पिस्तोल हे त्याने योगेश रघुनाथ मराठे ( वय २८ वर्षे, रा. सैलानी बाबा चौक, जेल रोड, नाशिक रोड) यांच्या कडुन विकत घेतले असल्याचे सांगितले. अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई अंबड पोलीस करत आहे. सदरची कामगीरीnमार्गदर्शनाखाली सपोनि. प्रविण सुर्यवंशी, खंडणी विरोधी पथक, बाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार पोहवा. किशोर रोकडे, राजेंद्र भदाणे, पोना दत्तात्रेय चकोर, योगेश चव्हाण, पोअं स्वप्नील जुंद्रे, विठ्ठल चव्हाण, भगवान जाधव, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारुदत्त निकम व सविता कदम आदीच्या पथकाने केली आहे.
