महाराष्ट्र शासन नाव असणाऱ्या वाहनावर कारवाई होणार कधी
महाराष्ट्र शासनातल्या काही विभागातली परिस्थिती अशी झाली आहे की आंधळ जळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे फोटो दिसणारी चार चाकी गाडी. टोयोटा कंपनीची इनोवा क्रिस्टा हे वाहन महाराष्ट्र शासनाचा नाव टाकून सर्रास फिरतंय मात्र आरटीओच्या वेबसाईटवर याचा तपास केला असता ही गाडी श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची असल्याचा समोर आला आहे. नेमकी ही गाडी कोण वापरत आहे . या गाडीला टुरिस्ट परमिट आहे . वास्तविक पाहता या गाडीचा नंबर पिवळ्या बर प्लेटने रंगवलेला असावा असा आरटीओ चा नियम आहे . मात्र आरटीओ चा नियम सर्रास धाब्यावर बसून गाडीला सफेद रंगाची नंबर प्लेट लावली आहे. अधिकारी या गाडीचा तपास करायला तयार नाहीत कारण ती गाडी आयुक्त मासे वापरतात अशी नाशिकमध्ये चर्चा आहे. खात्रीलायक सूत्रांची माहिती असली तरी या गाडीची शानिशा शासनाच्या अधिकाऱ्यांनी करायला हवी. कारण परिवहन खातं हे शासनाच्या नियमांवरती चालतात परिवहन खात सुद्धा डोळे मिटून माझ्या पाहत आहे पुढील काळात या वाहनावर आरटीओ किंवा शासकीय अधिकारी कारवाई करतील का असाच जनसामान्यांचा प्रश्न आहे
