शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई
नाशिक : शहरnशहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने वरील कारवाई सुरू आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसात नाशिक रोड परिसरात दर्शक ठिकठिकाणी छापेमारी करीत अवैधरीत्या सुरू असलेल्या दारुअड्ड्यांवर धडक कारवाई केली. याप्रकरणी नाशिक रोड, देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.nनाशिक रोड पोलिसांना एकलहरे रोडवरील बाजार समितीजवळ बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (ता. ८) रात्री छापा टाकला असता. संशयित सनीnराजेंद्र जाधव (२८, रा. सिन्नर फाटा) हा अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला. पोलिसांनी ४९० रुपयांच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिस शिपाई वाजे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, सामनगाव रोड भागात विकी चंदू चव्हाण (रा.. सामनगाव रोड) हा रविवारी (ता. ९) दुपारी कॉलेज परिसरातील पाट किनाऱ्याजवळ एका झाडाखाली अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला. संशयित चव्हाणच्या ताब्यातून देशी मद्याचा १ हजार ४७० रुपयांचा साठा जप्त केला. हवालदार शंकर काळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर, चेहडी बुद्रुक येथील एकलव्यनगर भागात संशयित किशोर अशोक जाधव (रा. दारणा हॉटेल समोर, चेहडी बु.) हा रविवारी (ता. ९) सायंकाळी एका टपरीच्या आडोशाला अवैधरीत्या दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक हजार ५४० रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला. पोलिस शिपाई राकेश बोडके यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संशयित शिवाजी बोराजी कुंदे (रा. कोळीवाडा, लहवित) हा घराच्या भिंतीलगत मद्य विक्री करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे ७०० रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला. पोलिस नाईक भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
