August 8, 2026

संपुर्ण शहर निळेमय डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह

0

 nn nn nn nnनाशिक : शहरnnयंदा शहरात जयंती सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह पहावयास मिळत आहे. संपुर्ण शहर निळेमय झाले आहे. विविध मंडळानी आकर्षक अशी देखावे बनविण्यात आली त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . गुरुवारी रात्री पासुनच शहरात ठिकठिकाणी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बौध्द वंदना व  पुजन करण्यात आले. शालीमार परिसरात नागरिकांनी डाँ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सीबीएस येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन शुक्रवारी रात्री 12 वाजता करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे. खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी आमदार वसंत गिते, हेमलता पाटील, आनंद सोनवणे, राजू रायमाले, भंते आर्यनाग, गौतम भालेराव, शरद काळे, विनायक पांडे, यतीन वाघ, सुधाकर बडगुजर, आकाश छाजेड, अजय बोरस्ते, दिपक डोके आदी उपस्थित होते.nnजुने नाशिक परिसरातील राजवाडा परिसरातून दुपारी मुख्य मिरवणूक सुरू होईल. चौकमंडई-भद्रकाली- मेनरोड-रविवार कारंजामार्गे शालिमारला ही मिरवणूक येणार आहे. उत्सवात अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *