तलाठी व कोतवाल १५०० लाच घेतांना अटक
nnजळगाव : भडगावnnतक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बु ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले आहेत.सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर स्वतः तक्रारदार यांचे व सोबत इतर ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे . तशी नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी सलीम अकबर तडवी ( वय-४४ वर्ष, तलाठी, सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु तलाठी कार्यालय ता.भडगाव जि.जळगाव) व कोतवाल कविता नंदु सोनवणे ( वय-२७ वर्ष, महिला कोतवाल, मौजे भोरटेक बु तलाठी कार्यालय ता.भडगाव जि.जळगाव ) तक्रारदार यांचे कडे २ काजल ५०० रु.लाच रकमेची मागणी केलेली होती. त्यापैकी दि११ एप्रिल २०२३ रोजी तलाठी यांनी तक्रारदाराकडून जागेवरच १ हजार रुपये घेतलेले होते . उर्वरीत रक्कम १ हजार ५०० रुपये लाच रकमेची मागणी करत असतांना १ व २ यांना मौजे भोरटेक बु तलाठी कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले . दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला .सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.शशिकांत पाटील,nयांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, फौ.दिनेशसिंग पाटील, फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदी च्या पथकाने केली.
