October 8, 2026

जुने नाशिक परिसरातून डाँ बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक उत्साहात संपन्न

0

 nnनाशिक : शहरnnभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जुने नाशिक परिसरातील मोठा राजवाडा येथून शोभा यात्रा व भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.हातात निळे झेंडे, डाेक्यावर टाेपी परिधान करुन डाँ बाबासाहेबांचा जयघाेष करण्यात आला.भीमसैनिकांनी सायंकाळी सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला. आकर्षक रोषणाई, चित्ररथ आणि ढोल-ताशांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले.यावेळी माजी खा समीर भुजबळ,   माजी आमदार वसंत गीते,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी महापौर विनायक पांडे,  भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, माजी नगरसेविका डॉ.हेमलता पाटील,उत्सव समितीचे किशोर घाटे, योगेश तेजाळे, महेश पगारे, अर्जुन पगारे , आनंद सोनवणे, बॉबी काळे,समाधान जेजुरकर, बबलू शेलार, शशी हिरवे,नाना पवार,  माजी नगरसेवक संजय साबळे , रामसिंग बावरी याच्यासह मान्यवर उपस्थित होते.nnभिमशक्ती मित्र मंडळ, राहुल मित्र मंडळ, माेठा राजवाडा, धम्मजागृती सांस्कृतिक मित्र मंडळ, सम्राट सोशल ग्रुप, बौध्द संदेश मित्र मंडळ, मल्हारखान मित्र मंडळ, भिमगर्जना युवक मित्र मंडळ, त्रिशरण सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ, सम्राट सोशल ग्रुप, संत कबीर कला व क्रिडा मंडळ, सिध्दार्थ मित्र मंडळ, प्रकाश कनोजे, एन. शिवराज मित्र मंडळ, महालक्ष्मी चाळ मित्र मंडळ, विश्वभूषण मित्र मंडळ, खडकाळी व राहुलवाडी सांस्कृतिक कला व क्रिडा मित्र मंडळांचा समावेश हाेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *