सिडकोत गोळीबार, एक जण गंभीर
सिडकोत गोळीबार, एक जण गंभीरnnनाशिक : शहरnn nnसिडकोत गोळीबार, एक जण गंभीरnnनाशिक: सिडकोत पुन्हा गोळीबार झाला. राकेश कोष्टी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सिडकोतील बाजीप्रभू चौकात ही घटना घडली. यात कोष्टी याला दोन गोळ्या लागल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्हेगारी टोळ्यांनी गेल्या काहीं दिवसात धुमाकूळ घातला आहे. कोयता गॅंग नंतर आता गोळीबारच्या घटना घडू लागल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे . गोळीबार करून संशयित पसार झाले. अंबड पोलिस ठाण्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.nn nn nn
