October 7, 2026

आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी पाच संशयितांना विरोधात गुन्हा

0

 nnनाशिक : शहरnnबांधकाम करून घेतल्यानंतर पैसे न देता फसवणूक करीत आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी पाच संशयितांना विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पवार यांनी १६ मार्च २०२६ रोजी पहाटे  उलटी करून ते बेशुद्ध झाले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात औषध उपचारांसाठी दाखल केले असता.  १८ मार्च २०२३ रोजी जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान  डॉक्टरांनी मयत घोषित केले.  त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात २५ मार्च २०२३ रोजी फिर्यादी घरात साफसफाई करीत असताना हॉलमधील टीव्हीच्या टेबलवरील डायरी उघडून पाहिली असता.  त्यात  एक चिठ्ठी दिसली. त्यामध्ये मयत हेमंत पवार यांनी २०१६ ते १८ मार्च २०२३ पर्यंत मुंबईतील बदलापूर येथील ऑर्चिड हाउसिंग इन्फा एल एल पी कंपनीचे संशयित कश्यप मेहता, शिवाजी इरमाळी, सुरेश जैन, सुनील कोठारी, मयंक जैन यांनी फिर्यादीचे पती हेमंत पवार यांच्या व्यंकटेश्वर कन्स्ट्रक्शन या फर्मकडून बांधकाम करून घेतले होते. मात्र, त्याचे त्याच्या कामाचे पैसे दिले नाही. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. परंतु निकाल लवकर लागत नसल्यामुळे पवार आर्थिक अडचणीतून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे चिठ्ठीतून समोर आले. त्यानुसार पाचही संशयितांविरोधात पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *