बिंगो गेम तरुणाला पडला महागात
nnनाशिक : जिल्हाnnऑनलाइन बिंगो (रोलेट) गेम खेळल्यास दुप्पट पैसे मिळत असल्याचे आमिष दाखवत ३६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद शुभम शेळके यांने लासलगाव पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेळके याला गणेश दिंडे (रा. नाशिक) याच्या लॉटरीच्या दुकानात दिंडे व अमोल कपिले यांच्या सांगण्यावरून ऑनलाइन बिंगो रोलेट गेम खेळल्यावर दुप्पट पैसे मिळत असल्याचे सांगितले. २१ फेब्रुवारी २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ यादरम्यान हा ऑनलाइन गेम खेळण्यास भाग पाडले. यात शेळके ३६ लाख ८० हजार रुपये हरले . याबाबत संशयित आंचल चौरसिया, रमेश चौरसिया (मुंबई), कैलास शहा, गणेश दिंडे (रा. नाशिक), अमोल कपिले (रा. अकोले, जि. नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
