October 7, 2026

झाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

nnनाशिक : मनपाnnझाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणी झाडांवर खिळे ठोकल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार  आहे.nnमहापालिकेकडूनही दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडांची लागवड केली जाते. मात्र, काही फुकटे या झाडांवर फलक-बॅनर लावणे, विद्युत रोषणाईकरून स्वत:ची जाहिरात करतात. अनेकजण झाडांना इजा पोहोचवतात. झाडांना त्रास होईल, असे कृत्य केले जात आहे. यामुळे झाडांची हानी होत असून, याविरोधात उद्यान विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.nnहॉटेल पीवर ग्रीन ऑल लिव्हज, रेड चिली, दि क्लिस्टो मल्टी कझीन व बॉबीज हॉटेल यांनी झाडांवर विद्युत रोषणाई करून स्वत:ची जाहिरात केली आहे. तर कॉलेजरोड येथील क्रोमा शोरूमनेदेखील झाडांवर जाहिरात केली आहे. झाडांचा वापर करून स्वत:च्या व्यवसायाची जाहिरात केल्याप्रकरणी सातपूर उद्यान निरीक्षकांनी सबंधितांना नोटिसा बजावत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.nn nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *