प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना अटक
nnनाशिक : वाडीवर्हेnnपत्नीसोबत पळून गेलेल्या प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना
पोलिसांनी अटक केली आहे. बुधा रतन वळवी, शंकर रतन वळवी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संपत मधू मुकणे (रा. वांगेवाडी, घोटी, मूळ रा. जोगलवाडी, जि.पालघर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण अष्टेकर यांच्या वीटभट्टीवर संपत मुकणे हा कामाला होता. वीटभट्टीवरील कामगार शंकर वळवी याचे मुकणेच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. त्याची पत्नी शंकर वळवी सोबत ९ एप्रिल २०२३ रोजी पळून गेली होती. त्याचा राग मनात धरून शंकर वळवी व बुधा रतन वळवी यांनी संपत मुकणे यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दोघांनी त्याचा मृतदेह गरुडेश्वर शिवारात मुंढेगाव ते अस्वली जाणारे रोडलगत मरीमाता मंदिरालगत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संपत मुकणेची आई शांताबाई मुकणे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक त्याचा राग मनात सुनील बिऱ्हाडे, पोलीस शिपाई पी. जी. गायकवाड करीत आहेतnn
