August 8, 2026

शहरात आयकर विभागाचे बांधकाम व्यावसायिकांवर छापे

0

 nnनाशिक : शहरnnशहरात  बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालय घरामध्ये आयकर विभागाने छापे टाकत कारवाईला सुरुवात केल्याने शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी विविध ठिकाणी राछापे टाकत कारवाई आहेत.nnशहराच्या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.nविविध ठिकाणांवर जवळपास 100 पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद , पुणे , मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.nआयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठीच खळबळ उडाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *