August 9, 2026

इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश

0

 nnनाशिक : इगतपुरी nn nnरेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे. यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत मुंबई रेल्वे विभागातील पंधरा रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकीकरण होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील इगतपुरी रेल्वे स्थानकाचा समावेश रेल्वे आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे बोर्डाकडे सततचा पाठपुरावा करून इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून घेतला आहे.nnयेत्या काही दिवसांत इगतपुरी रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा निर्मिती करण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असून, वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाचे रुपडे पूर्णतः बदलणार आहे. यामुळे इगतपुरी शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी रेल्वे स्थानकाची दुरवस्था झालेली आहे. प्रवाशांसाठी योग्य त्या सोयीसुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलण्यासाठी या रेल्वे स्थानकाचा अमृत बाजार स्टेशन योजनेत समावेश होण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. हेमंत गोडसे सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. मुंबई रेल्वे विभागातील पंधरा रेल्वे स्थानकांचे अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अत्याधुनिकीकरण होणार असून, यामध्ये इगतपुरी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. येत्या दोन महिन्यांत रेल्वे स्टेशनच्या अत्याधुनिक कामाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून, वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण पूर्ण होणार आहे. येत्या महिनाभरात रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार  आहे.  रेल्वे  स्टेशनच्या भव्य अत्याधुनिकीकरणामध्ये प्रवेशव्दार, फेरीवाले क्षेत्र, वातानुकूलित वेटिंग हॉल, शौचालये, एस्केलेटर, वाय-फाय सुविधा, व्हीआयपी कक्ष, वातानुकूलित व्यावसायिक स्टॉल, इमारत सुधारणा, मल्टीमॉडम इंटिग्रेशन, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्टेशनचे एकत्रीकरण, शाश्वत व पर्यावरणपूरक अशा सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे येत्या वर्षभरात इगतपुरी रेल्वे स्थानकाला नव्याने झळाळी मिळणार असून, स्टेशनचे रुपडे पूर्णतः बदलले जाणार आहे. रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर विशेष सुविधा मिळणार असून, इगतपुरी शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार असल्याची खा हेमंत गोडसे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *