August 9, 2026

कैलास मुदलियार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0

नाशिक रोड ये बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदलियार यांचा वाढदिवस दत्त मंदिर येथील बालाजी सोशल फाउंडेशन च्या ऑफिसमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.कैलास मुदलियार बालाजी सोशल फाउंडेशन सह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतात. नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय कैलास मुदलीयार मानले जातात. रेजिमेंटल प्लाझा येथे बालाजी सोशल फाउंडेशनचा दहा दिवसीय गणपतीचे आयोजन कैलास मुदलीयार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करत असतात. जेलरोड परिसरात विजन एकेडमी नावाने पहिली ते दहावी इंग्रजी माध्यमाची शाळा ही सुरू आहे जेलरोड येथे  कैलास मुदलियार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला कैलास मुदलियार यांच्या प्रयत्नाने साईबाबा मंदिराची स्थापना करण्यात आली आहे तसेच गंधर्व नगरी येथे श्री बालाजी मंदिराची स्थापना करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. कैलास मुदलियार यांची राजकीय व सामाजिक भरीव कामगिरी आहे. कैलास मुदलीयार यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात नाशिक रोड परिसरात साजरा केला अनेक शुभचिंतक हितचिंतकांनी कैलास मुदलीयार यांना सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *