छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश ; राज्यातील पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
nn
nमाहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी पदासाठी पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांना मिळणार संधीnnनाशिक :- छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यातील पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी पदासाठी पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांना मिळणार संधी मिळणार आहे. याबाबत जाहिरातीत सुधारणा करून अर्ज भरण्यासाठी ८ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.nnपत्रकारिता पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, माहिती व जनसंपर्क महासंचालनामधील जाहिरात क्र. १२९/२०२२ उपसंचालक, १३० / २०२२ वरिष्ठ सहायक संचालक/ जिल्हा माहिती अधिकारी, १३१/२०२२ सहायक संचालक/ माहिती अधिकारी या तीनही पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे डिसेंबर २०२२ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. या जाहिराती मध्ये किमान शैक्षणिक अर्हता पत्रकारितेतील पदवी व पदविका नमूद करण्यात आली आहे. परंतु उच्च शैक्षणिक अर्हता म्हणजे पदव्युत्तर पदवीधारकांचे अर्ज भरले जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले.nnत्यांनी म्हटले आहे की, याबाबत यापूर्वी दिलेल्या पत्राद्वारेही मी शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र शासनस्तरावर कोणतही कार्यवाही झाली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी संबंधित जाहिरातीबाबत एक शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करून या भरतीस २५ एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र मुदतवाढ देतांना त्यात पदव्युत्तर पदवीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी पुन्हा या भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.nnमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या जाहिरातीत प्रचंड विरोधाभास दिसून येतो. जाहिरातील निवड प्रक्रियेतील क्र. १०.१ नुसार प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही.’ असे स्पष्ट नमूद केले आहे. पदवी व पदविका ही जर पत्रकारितेतील किमान शैक्षणिक अर्हता असेल तर कमाल शैक्षणिक अर्हता म्हणजे पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी, सेट, नेट, एम फिल, पीएचडी यांचा समावेश होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. याबाबत सारासार विचार करून हजारो पद्व्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रकारीता पदव्युत्तर पदवी धारकांना अर्ज करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
