August 9, 2026

डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करणाऱ्या ८ विधिसंघर्षित बालकांसह तिघाना अटक

0

nnनाशिक : सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अर्वाच्य भाषा वापरल्याचा रागातून २४ वर्षीय तरुणाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करणाऱ्या ८ विधिसंघर्षित बालकांसह तिघा संशयितांच्या अंबड पोलिसांनी अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्या. अशी माहिती परिमंडळ २ उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.nnअंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावतानगर येथे सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरत प्रत्यांश हॉटेल येथे येत काही संशयितांनी परशुराम बाळासाहेब नजान (२४) याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केल्याची घटना (दि. २५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याघटनेची माहिती समजताच सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, सहाय्यक आयुक्त गुन्हे वसंत मोरे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार, उत्तम सोनवणे, नाईद शेख, सुनील बिडकर, किरण शेवाळे आदींसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यावेळी पोलिसांनी कौशल्याच्या आधारे ८ विधी संघर्षित बालकांसह ओंकार दिलीप बागुल (१८, रा. कामटवाडा, राजवाडा, नाशिक), वैभव उर्फ गिल्या गजानन शिर्के (२२, रा. गोपाळ कृष्ण चौक, कामटवाडा, नवीन नाशिक ), अमोल बापू पाटील (२३, रा. गोपाळ कृष्ण चौक, कामटवाडा, नवीन नाशिक) यांना सापळा रचून अटक केली. ही कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले, किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार, उत्तम सोनवणे, नाईद शेख, सुनील बिडकर, किरण शेवाळे अंमलदार संजीव जाधव, रवींद्र पानसरे, किरण गायकवाड, राकेश राऊत, संदीप भुरे, जनार्धन ढाकणे, अनिल ढेरिंगे आदींनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *