August 8, 2026

शहरात कोयते बाळगण्यास मनाई; पोलिस आयुक्तांचे आदेश

0

nnनाशिक : शहरnnपोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये हे मनाई आदेश जारी केले आहे. शहरात सध्या खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाणीवपूर्वक दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यामध्ये कोयता शस्त्राचा वापर करण्यात येत असल्याने जीविताचे रक्षण करण्याकरिता तसेच सार्वजनिक शांतता राखण्याकरिता २६ जूनपर्यंत मनाई आदेश जारी केले आहे.nnया आदेशान्वये शहरात कोणत्याही ठिकाणी कोणीही व्यक्ती कोयता व धारदार शस्त्र या आदेशात जारी केलेल्या पद्धतीला अनुसरल्याशिवाय विक्री करणार नाही. जीवनावश्यक वस्तूशी निगडित कृषी साहित्य, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूखेरीज इतर वापराकरिता कोयता व त्यासारखे इतर शस्त्र विक्री करणार नाही. जीवनावश्यक प्रयोजनाकरिता शस्त्र विक्री करताना खरेदी करणाऱ्यांचे नाव, मोबाइल नंबर व त्यांचा पत्ता, आधार क्रमांक नोंद वहीत नोंदविणे आवश्यक आहे. असे केल्याशिवाय शस्त्र जीवनावश्यक प्रयोजनाकरिता विक्री करता येणार नाही. जीवनावश्यक प्रयोजनाखेरीज कोणत्याही कारणाकरिता, नाशिक शहरात सार्वजनिक ठिकाणी, व्यापारी पेठ, चौकात तसेच , शाळा, कॉलेज परिसरात कोयता व कोयत्यासारखे धारदार हत्यार कुणीही जवळ बाळगणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *