October 8, 2026

तपोवनात चाकूचा धाक दाखवून युवकास लुटले

0

nnनाशिक : शहरnnतपोवनातील सांडपाणी शुद्धीकरण केंद्राजवळ चौघांनी युवकास चाकूचा धाक दाखवून जबरीने लुटल्याची घटना घडली आहे. .nnपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश दिलीप करपे (वय २६, रा. अथर्व रोहाउस, रामकृष्णनगर, शांतीनगर, मखमलाबाद) हा युवक बुधवारी रात्री तपोवनातील सांडपाणी शुद्धीकरण केंद्राजवळ मोबाइलवर बोलत होता. यावेळी मोटारसायकलवरून चौघे जण आले. त्यांनी योगेश यास चाकूचा धाक दाखवून सॅमसंग व विवो कंपनीचा मोबाइल तसेच चांदीची चेन असा १२ हजारांचा ऐवज चोरून नेला. आडगाव पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला असून, उपनिरीक्षक अशोक पाथरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *