August 8, 2026

दक्ष नागरिकांमुळे मध्य धुंद अवस्थेत असलेला रिक्षा ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात

0

सतीश रुपवते नाशिक

n

नाशिक शहरात रिक्षा चालकांचा उपद्रव नागरिकांना नवीन नाही. काही रिक्षाचालक आपली उपजीविका रिक्षावरतीच चालवतात किंबहुना संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करतात तर काही रिक्षा चालक फक्त आपली मौजमजा आणि पाकीट खर्च कसा निघेल अशा दृष्टीने रिक्षा चालवतात आणि हेच मौज माज्या करणारे रिक्षा चालक समाजाला घातक ठरतात. आपलं राज्य या वृत्तवाहिनीचे संपादक भूषण देव आपल्या मोटार सायकलवर एका बातमी निमित्ताने मुंबई नाक्यापासून तर जुना सीबीएस येथे येत असताना एक मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग वर त्यांचे लक्ष गेले. मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग करणारा रिक्षा ड्रायव्हर काही लोकांना कट मारून पुढे जात होता तर काही लोकांना थेट उडवून आपली रिक्षा विरुद्ध दिशेने चालवत होता. संपादक भूषण देव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरचा पाठलाग केला. या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने तीन अपघात केले एका वृद्ध महिलेला, एका लहान मुला आणि एका पायी चालणाऱ्या नागरिकाचा या तिघांनाही उडवून दिले गंभीर दुखापत झाली नसली तरी अपघात मात्र झाला आहे हे मान्य करावे लागेल. शेवटी मद्यधुंद अवस्थेत असलेला रिक्षा ड्रायव्हर जुन्या सीबीएस परिसरात भूषण देव यांनी गाठले आणि त्याला रिक्षा बाहेर काढले. समोर असलेल्या ट्राफिक पोलिसाकडे त्याची तक्रार केली. रिक्षा ड्रायव्हर आणि त्याचा मित्र मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याने त्वरित सरकार वाडा भद्रकाली व मुंबई नाका चार्लीला कॉन्टॅक्ट करून या तिघांनाही संबंधित ठिकाणी बोलावले व त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा ड्रायव्हर वर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली. हे सर्व सांगण्यामागचा प्रपंच इतकाच अशा वाईट प्रवृत्तींना आपण बळी पडू नका मद्यधुंद अवस्थेत असलेला रिक्षा ड्रायव्हर किंवा अन्य कोणीही व्यक्ती समाजास त्रासदायक ठरत असेल तर त्याची तक्रार थेट पोलीस स्टेशनला करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *