सिटी लेवल टेक्निकल सेल अभियंतास 17 हजारांची लाच घेतांना ताब्यात
nnसंगमनेर : तक्रारदार यांनी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळणे कामे संगमनेर नगरपरिषद येथे अर्ज दाखल केला होता. मंजूर झालेले अनुदानाची शिफारस करून तक्रारदार यांना अनुदान मिळवून देण्यासाठी संशयितांने तक्रारदाराकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दुसऱ्या हप्त्याच्या 20 हजार रुपये लाचेच्या रकमेची तडजोडी अंती 17 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारताना सिटी लेवल टेक्निकल सेल अभियंता, (कंत्राटी)विकास सुरेश जोंधळे ( वय 28 वर्ष.nसंगमनेर नगरपरिषद) यास रंगेहात पकडत कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर अधिक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमनेर संदीप साळुंखे , हवालदार. पंकज पळशीकर , पोलिस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रकाश महाजन, परशुराम जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने केली.
