August 8, 2026

फुलेनगर परीसरात गावठी दारुअडडयावर छापा गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी

0

nनाशिक : शनिवारी रोजी तेलंगवाडी फुलेनगर पंचवटी येथे एका किराणा दुकानाचे बाजूला असलेल्या घराजवळ गल्लीमध्ये मोकळया जागेत दोन इसम गावठी हातभटटीची तयार दारू चोरटया रितीने विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क. १ पथकास मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. १ कडील पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा ७९१ रामदास गंगाधर भडांगे, पोहवा ७१५ सुरेश निवृत्ती माळोदे, पोहवा २२१ योगीराज यशवंत गायकवाड, पोहवा २३३ धनंजय कौतीक शिंदे, पोना ९९१ मोतीराम गणपत चव्हाण, पोअं २०५५ गौरव अरविंद खांडरे आदी च्या पथकाने सदर ठिकाणी जावून छापा मारला असता निस्सी किराणा दुकानाच्या जवळ गल्ली नं ३ येथील बोळीत मध्ये मोकळया जागेत दोन इसम हे गावठी हातभटटीची तयार दारूची विक्री करत असतांना बातमीप्रमाणे खात्री झाल्याने एका इसमास जागीस पकडून ताब्यात घेतले. व दुसरा इसम पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला. ताब्यात घेणाऱ्या इसमाचे नाव सागर संजय पवार वय २४ वर्ष रा. फ्लॅट नं ७१, पाचवा मजला, सम्राट अशोक नगर, फुलेनगर, पंचवटी नाशिक असे असुन त्याच्या ताब्यातून गावठी हातभटटीच्या तयार दारूने भरलेल्या २० लिटरच्या प्लास्टीकच्या ०३ कॅन व १० लिटरच्या प्लास्टीकच्या ०३ कॅन अश्या एकूण ०६ प्लॅस्टीकच्या कॅन त्यात एकूण ९० लिटर गावठी हात भटटीची तयार दारूने भरलेल्या ९ हजार ,९००/- रू किंमतीच्या विक्री करण्याच्या उददेशाने कब्जात बाळगतांना मिळून आला त्यास लागलीच ताब्यात घेवून जप्त केलेल्या मालाचे सॅम्पल घेवून त्या जागीच नष्ट करण्यात आल्या असून पळून गेलेल्या इसमाचे नाव अनिल हनुमंत जाधव रा. तेलंगवाडी, फुलेनगर पंचवटी, नाशिक असे असून ताब्यात घेतलेल्या इसमास मुददेमालासह पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर इसमाविरुदथ पंचवटी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nnसदरची कामगिरी मा. श्री. अंकूश शिंदे, पोलीस आयुक्त साो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा ७९१ रामदास गंगाधर भडांगे, पोहवा ७१५ सुरेश निवृत्ती माळोदे, पोहवा २२१ योगीराज यशवंत गायकवाड, पोहवा २३३ धनंजय कौतीक शिंदे, पोहवा १५०६ शरद सोनवणे, पोना ९९१ मोतीराम गणपत चव्हाण, पोअं २०५५ गौरव अरविंद खांडरे अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *