August 8, 2026

शहरातील दोन पोलिसांची आत्महत्या

0

nनाशिक : म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. ड्युटीवर हजर होण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पोलीस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.nदुसरी घटना पोलीस आयुक्तालयात घडली आहे. तोरणमाळ येथील पोलीस कर्मचारी मोहन बोरसे हे दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दाखल झाले होते. शहर पोलीस आयुक्तालयात मोटार वाहन विभागात कार्यरत होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. मात्र सकाळी पोलीस कर्मचारी गेले असता बोरसे यांनी शेडमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र बोरसे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. शहरात बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती आणि आज पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळ हादरले आहे.nn n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *