August 8, 2026

दुचाकी चोरटयाचा आता चारचाकी चोरीकडे मोर्चा

0

nnनाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयीतांनी आता चारचाकी चोरीकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या पाच दिवसात विविध भागातून तीन चारचाकी चोरी झाल्या आहेत. दुचाकी चोरांसह चारचाकी चोरांना शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे. रविवार रोजी रात्रीच्या सुमारास पखाळरोड येथून ईरटीका चारचाकी चोरी झालीये. या चोरी ची घटना cctv मध्ये कैद झाली आहे.मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.खडकाळी परिसरातून अजहर शेख यांची सुमारे ३० लाखांची फॉर्च्यूनर चारचाकी बुधवार रात्रीच्या सुमारास राहत्या घराच्या बाहेरून चोरीस गेली. ही घटना ताजी असतानाच शुक्रवार रात्री माने नगर भागातून मालवाहू पिकअप चारचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्या पाठोपाठ रविवार रोजी रात्रीच्या सुमारास पखाळरोड येथून मुकुंद पवार यांची एम एच १५, एच जी ८२८३ ईरटीका चारचाकी चोरीस गेली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अज्ञात संशयित चारचाकी चोरून नेत असल्याचे कॅमेऱ्यात आढळून आले. श्री. पवार यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यास आळा बसा म्हणून पोलीस आयुक्तालयकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. आता चोरट्यांनी चारचाकी वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या पाच दिवसात विविध भागातून तीन चारचाकी चोरी झाल्याने चारचाकी चोरांना शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *