August 8, 2026

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरात २५ ते २८ मे दरम्यान चार दिवसीय ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पो’चे आयोजन

0

 nnnn*केंद्रिय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते ‘ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पो’चे गुरुवारी होणार उद्घाटन*nn nn*चार दिवसीय एक्स्पोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देणार एक्स्पोला देणार भेटी*nn nn*नाशिक,दि.२३ मे :-*nनाशिकची वाटचाल देशाची लाॅजेस्टिक कॅपिटलकडे सुरु असून त्यास बूस्ट देण्यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजीत चार दिवसीय ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे उद्घाटन गुरुवारी (दि.२५) केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांच्या हस्ते ठक्कर डोम येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री, खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व ट्राॅन्सपोर्ट इंड्रस्टीजमध्ये पन्नासवर्ष सेवा देणारे चालक किसन पवार, मेहबूब पठाण या वाहकांनाही उद्घाटनाचा मान दिला जाईल, अशी माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट अध्यक्ष राजेंद्र (नाना) फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली.nnऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पोचे वैशिष्ट म्हणजे अगदी सायकलपासून ते अवाढव्य जेसीबी, ट्रेलर देखील या ठिकाणी प्रदर्शनाला भेट देणार्‍यांना पहायला मिळेल. एकप्रकारे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा इतिहास ते भविष्य याचा प्रवास उलगडला जाईल. गुरुवारी उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे. त्यात विविध राज्यातील कलांचे सादरीकरण केले जाईल.nnशुक्रवारी (दि.२६) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते ‘कोशिषे कामयाबी की’ पुरस्कार वितरण सोहळा केला जाईल. त्यात मागील पन्नास वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणार्‍या वाहकांचा तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा सन्मान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल. त्याअगोदर दुपारी तीन वाजता ट्रक चालक आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी ‘होम मिनिस्टर’ या धमाल गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे.nnशनिवारी (दि.२७) दुपारी २ वाजता ऑर्केस्ट्रा लिट्ल वंडर तर सायंकाळी ६ वाजता चलती का नाम गाडी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.nnप्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि.२८) दुपारी ३ वाजता ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सपोचा समारोप होईल. या एक्स्पोसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रिसह नाशिककरांनी या एक्स्पोला आवर्जून हजेरी लावावी व प्रदर्शनासह फूड फेस्टिवलसह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.nn*फुड फेस्टिव्हल आकर्षण*nnप्रदर्शनाला देशभरातील नाम‍वंत हस्तींसोबत मोठ्या संख्येने नागरिक भेट देणार आहे. त्यामुळे एक्स्पोत देशभरातील व्यंजनाचा सहभाग असलेले ‘एक देश अनेक व्यंजन’ फूड फेस्टिवल मुख्य आकर्षण असणार आहे. चारही दिवस हे फूड फेस्टिवल सुरू राहणार असून नाशिककरांना या फूड फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे.nn*सारथी सुविधा केंद्र*nnएक्स्पोच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व घटकांना केंद्राचे आणत या क्षेत्रासाठी महत्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी सर्व सुविधायुक्त रेस्ट रूम (सारथी सुविधा केंद्र) उभारण्याचा संस्थेचा उद्देश आहे. मार्च महिन्यात संस्थेतर्फे आयोजीत ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’ला केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती.त्यांच्या उपस्थितीत प्रस्तावित सारथी केंद्राचे सादरीकण झाले होते.nn*कुशल अकुशल कामांसाठी रोजगार मेळावा*nnस्किल डेव्हलमेंट विभाग महाराष्ट्र शासन व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून कुशल व अकुशल कामगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामाध्यमातू रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.nn*प्रतिक्रिया*nnदळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यामध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकानी करावयाचे बदल तसेच सारथी सुविधा केंद्राची निर्मिती हा एक्स्पोचा मुख्य उद्देश आहे.nn- राजेंद्र (नाना) फड, अध्यक्षnनाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनnn*पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडपाचे भूमीपुजन*nnनाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.२३ रोजी सकाळी मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *