August 8, 2026

त्र्यंबकेश्वर येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती.

0

nत्र्यंबकेश्वर : भाजप आमदार नितेश राणे काल त्र्यंबकेश्वर राजांची महाआरती केली . उत्तर प्रवेश महाद्वार येथे आरती करण्यात आली.यावेळी सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती.माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची हजर होते.nपत्रकारांशी वार्तालाप प्रसंगी आमदार नितेश राणे म्हणाले की, या भागातील शांतता भंग करणे हा आमचा हेतू नाही. पण सातत्याने १३ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात जे गैरसमज पसरवले जात आहे, हिंदूंची बदनामी केली जातेय, त्या सगळ्याबाबतीत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार, ट्रस्टनुसार आज आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो आहे . मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असे सातत्याने बोलले जाते. परंतु, हे साफ खोटे आहे. असा दावा त्यांनी केला. सरकारने एसआयटी चौकशी पोलीस तपास या यंत्रणा वर भर दिला.आहे याचा उल्लेख नितेश राणे यांनी केला.nया वेळी बंटी दीक्षित, बाळू कळमकर ,कैलास पाळेकर कौशिक अकोलकर ,वाडेकर बंधू, सुयोग शिखरे, सुयोग शिखरे तेजस ढेरगे, कैलास पाळेकर विष्णू दोबाडे, गजू घोडके कैलास देशमुख, रामचंद्र गुंड,सकल हिंदू समाज कार्यकर्ते सामील उपस्थित आरतीत सामील होते.nमाजी आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांचीnआपले मनोगत व्यक्त केले.nवरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगणे, पो नी.शेवाळे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गोपनीय पोलीस , एस. आय. टी. चे नाशिकचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.nत्रंबक नगरीत शांतता आहे एकोपा असून नेहमीप्रमाणे नगरीत वातावरण आहे. मे महिन्यामुळे यात्रेकरू भाविकांची गर्दी वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *