बँकिंग अॅपच्या माध्यमातून सात लाखांची फसवणूक
nn
nnनाशिक : भामट्याने बँक खातेधारकाच्या मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करून सुमारे सात लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकी आला. याप्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक खातेधारकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्याने १६ ते १८ मार्चदरम्यान गंडा घातला. भामट्याने बँक खातेधारकाच्या दोन्ही खात्यांवरील बँकिंगचा वापर केला.n
ॲपचा ॲक्सेस मिळवून भामट्याने सहा लाख ९९ हजार रुपये चार वेगवेगळ्या बँक खात्यांत वर्ग केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँक खातेधारकाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भामट्यासह ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या खातेधारकांविरोधातही गुन्हा दाखल आहे. सायबर पोलीस तपास करत आहेत.
