जिल्ह्यातील ४६ अवैध दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलीसांचे एकाच वेळी छापे

nnनाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल गुरुवारी (दि25) रोजी पहाटे चार वाजता ग्रामीण पोलीसांच्या सुमारे ५०० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून सुमारे दहा लाख रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्रीnजप्त केली. संबंधीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल केले आहेत.nया धाडसत्रात जिल्ह्यातील कळवण मधील ११, वाडीव-हे मधील ५, मालेगाव तालुका हद्दीतील ४. सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा व इगतपुरी मधील प्रत्येकी ३, निफाड व पेठमधील प्रत्येकी २, सिन्नर, अभोणा, वणी व त्रंबकेश्वर मधील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.nnसदर कारवाईदरम्यान पोलीसांनी अवैध दारु गाळप करणा-या ठिकाणांसोबतच रसायन बनवण्यासाठी लागणा-या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करून विशेषत: सटाणा तालुक्यातील टॅगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावांतून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ व नवसागर जप्त केला आहे.nnसदर कारवाईत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचेसह सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, कविता फडतरे, ३१ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह ९ विशेष पथकांनी सहभाग घेतला.nnअवैध व्यवसाय रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी नुकतीच १२ विशेष पथके गठीत केली असून त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणा-या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.
