गुंगीकारक औषध देवून लुटणारी महीला व तिच्या ०४ साथीदारांची टोळी जेरबंद
nn०४ गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाईnनाशिक : म्हसरुळ पोलीस ठाणे येथे फिर्यादी बापू किसन सुर्यवंशी रा. सावतानगर सिडको, नाशिक यांनी तक्रार दिली होती. दिनांक १२ में २०२३ रोजी रात्री ८ .३० चे सुमारास एका अनोळखी महिलेने मला फोन करून सुरत येथे जायचे आहे . हॉटेल सायबाच पुढे अमृततुल्य दुकानासमोर दिंडोरीरोड, नाशिक येथे कार मध्ये बसुन वणी येथे सदर महिलेचा अनोळखी मित्र कार मध्ये बसवत फिर्यादीला देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढ़ा खायला दिला . त्यानंतर फिर्यादी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांची कार व अंगावरील सोन्याचे दागीने व पाकीट असा १ लाख ,२१,हजार- रूपये किंमतीचा माल चोरुन घेवुन पळुन गेले होते. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे सु.र.नं. १०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक १९/०५/२०२३ रोजी दाखल झाला होता.nnशाखा युनिट १ नाशिक शहर कटील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक माहिती व सि. सि. टी. व्ही. फुटेज च्या आधारे म्हसरूळ पोलीस स्टेशन ला दाखल गुन्हयात सहभागी असणारा संशयित निलेश राजगीरे यास ताब्यात घेतले. त्याचे कडे अधिक तपास करता सदर गुन्हयात मुख्य सहभाग असणारी महीला व मुख्य संशयित दिनेश विजय तसेच त्यांचे साथीदार किरण वाघचौरे व मनोज पाटील यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निप्पन्न झाले. पुढील तपास करून संशयित किरण वाघचौरे व मनोज पाटील यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य संशयित दिनेश विजय कवाडे हवास दि. २२ में २०२३ रोजी जेलरोड भागातुन स्विप्ट कार एफ. एम एच १९ बी यु ६५८५ सह ताब्यात घेतले. त्याचे या गुंगीकारक औषधे मिळून आली., स्विप्ट कार बाबत तपास करता मुख्य संशयित दिनेश विजय कवाडे याने त्याची महीला साथीदार यांनी दि. २१/०५/२०२३ रोजी रात्री एका अनोळखी इसमास गुंगीचे औषध देवुन त्याला लुटुन त्याची कार पळविल्याचे सांगीतले. त्यावरून महीलेचा शोध घेत ताब्यात घेतले. मा. न्यायालया समोर हजर केले असता त्यांना दि. २६/०५/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोटडी रिमांड दिली आहे. पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर संशियातांकडे एकत्रीत अधिक तपास करता त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर टोळी कडुन म्हसरूळ पोलीस ठाणे गुन्हयातील फिर्यादी यांची सियाज कार एमएच ०४ एवं एक ७३९१ व लुटलेले २९ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.nnयतीरिक्त आडगाव पो. वडील गुरनं १२२ / २०२३ भादवि कलम ३२८, ३७९, २४ या गुन्हयातील १३ सीने घडयाळ व मोबाईल हस्तगत केले आहे. तसेच त्यांचे बघुन स्विप्ट कार क. एम एच १२ वी यु ६५८५ मा कार एमएच १५ जी आर ५६३२ हस्तगत केल्या आहेत. असा एकूण १४ लाख ,८६, हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीन १) म्हसरूळ पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८,३७९, ३४ प्रमाणे,nn(२) व पोलीस स्टेशन गु.र.नं. १२२ / २०२३ भादवि कलम ३२८,३७९, ३४ प्रमाणे ३) कासा पोलीस ठाणे, पालघर गु.र.नं. ५२/२०२३ भा.द.वि. कलम ३२८, ३९२, ३४ प्रमाणे ४) वाळुंज पोलीस दाणे, औरंगाबाद जु. २. नं. ६८/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ असे गुन्हे आडकीस आलेले आहे. तसेच यातील मुख्य संशयित दिनेश विजयवाडे यांचे वर बनवा पोलीस ठाणे अहमदाबाद राज्य गुजरात येथे गु. २.नं. ५०३/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, १२०५, ११४, ३४ प्रमाणे व किरण एकनाथ चौरे यावे पर सिटी पोलीस ठाणे, श्रीरामपुर येथे गु.र.नं. ११२०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहे. अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट 1 पोलीस उप निरीक्षक . चेतन श्रीवंत हे करीत आहे.nnसदर कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव , सहा पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ , सहाय्यक निरीक्षक हेमंत गोडकर, पो.उप निरी. चेतन श्रीवंत, सपोनि / रविंद्र बागुल, पो. हया / प्रविण वाघमारे, नाइम पठाण, धनंजय सिन्दे विशाल देवरे, विशाल काटे, महेश साळुंके, आप्पासाहेब पानवळ मुख्तार शेख, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, मनोज डोंगरे, सवनी मगर, चालक साजन / किरण शिरसाठ, पो.अ./ समाधान पवार यांनी केली आहे.
