August 8, 2026

इगतपुरीत सव्वा कोटीचा अवैध गुटखा जप्त

0

nइगतपुरीत : सव्वा कोटीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून दोन कंटेनर ताब्यात घेतले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारे दोन कंटेनर किल सकाळी 10 वाजता इगतपुरी पोलिसांनी तपासणी दरम्यान पकडले. दोन्ही कंटेनरमधून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.मागील पंधरा दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलीस सापळा रचून मागावर होते.nआज सकाळी गुटख्याने भरलेले सदरचे कंटेनर इगतपुरी परिसरात आले असता, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व अंमलदारांनी सदरचे कंटेनर नं. HR-47 E-9140 व HR-382-3937ताब्यात घेतले आहेत.सदर गुटखा हरियाणा राज्यातून भिवंडीत जात होता.nजप्त केलेल्या मालात ४ के स्टार आणि एस एव के या प्रतिबंधीत गुटख्याचे बँडचा समावेश आहे.nसदर प्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं ११२ / २०२३ भादवि कलम ३२८, २७२ २७३ ४२० १८८, ४६५, ४६८, ४७१, ३४ सह अन्न सुरक्षा मानके कायदा सन २००६ चे कलम ५९ अन्वये चार इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करीत आहेत.nसदर प्रकरणात, आतापर्यंत संशयित सलमान आमीन खान, वय ३२, व इरफान आमीन खान, वय ३१, दोन्ही रा. नखरोला, ता. होडल, जि. जलवाल, हरियाणा यांना अटक करण्यात आली . इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित आरोपी हे सख्खे भाऊ असून मागील काही वर्षांपासून ते गुटख्याचे काम करत आहेत.nसदर प्रकरणी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस पथकास २५ हजार रू. चे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *