August 9, 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर नामकरण फलकावर होर्डिंग्ज लवणाऱ्यांवर मनपाने कारवाई करावी

0

nnमित्रमेळा परिरावराततर्फे निवेदनnnनाशिक रोड : येथे उड्डाणपुलाचे उद्धघाटन हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आले. पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना हे गाव कुणाचे आहे . त्यांचे कार्य स्मरणात राहवे या करिता उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले. देशातील स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांचे मेरूमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी म्हणून (भगूर) नाशिक शहर हे जगप्रसिद्ध आहे, त्या अनुषंगाने स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातला पहिला आणि नाशिक महानगरपालिकेचा पहिला उड्डाणपूलाचे उदघाट्न करत असताना पुलाचे नामकरण करत स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव दिले परंतु राजकीय स्वार्थ साधताना ‘चमकोगिरी करणाच्या काही सामाजिक विघातक कृत्य करणारे अल्पबुद्धी महानगरपालिकेच्या मालकीच्या नामकरण फलकावर होर्डिंग द्वारे सामाजिक वातावरण आणि शहर प्रदूषण करत आहेत. शहरातील प्रवेश आणि शहर सोडताना स्वातंत्रवीर सावरकरांचे गाव शहर म्हणून जनसामान्याना माहिती करणारा प्रवेशद्वारावरचे नावच झाकले जात असून स्वातंत्रवीर सावरकर यांचे इतिहास झाकले जाते. दत्तमंदिर याठिकाणी असलेली कमान आणि बिटको चौकात असलेले “स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महानगरपालिकेने लावलेले नाव कुठल्याही होर्डिंगने झाकले जाऊ नये, तसेच त्याठिकाणी होर्डिंग लावण्यास मज्जाव करावा, परवानगी देऊ नये, बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी मित्र मेळा परिवारातर्फे करण्यात येऊन त्यासाठी नाशिक मनपा रोड विभागीय अधिकारी हरिश्चंद्र यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका तसेच माजी स्थायी समिती सदस्य सिमा राजेंद्र ताजने, मित्र मेळा परिवाराचे संस्थापक राजेंद्र कंनु ताजने, हेमंत पुजारी, संजय दातकर, सचिन सूर्यवंशी, शरद टिले, ज्ञानेश्वर काजळे, राजेंद्र वाघ, सागर वाघचौरे, अख्तर पटेल, किरण डहाळे,विलास थोरात, रमेश पाळदे,किरण सुरेश काळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *