20 हजारांची लाच घेतांना लेखा अधिकारी ताब्यात
nजळगाव : तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-2021-2022 या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर सदर वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये एकुण ७३ हजार रुपये डी.डी.द्वारे अदा करण्यात आलेले आहेत. सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३ हजार रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी एकुण ७३ हजार -रुपये रकमेच्या अर्धा टक्का प्रमाणे प्रथम ३६ हजार ५००/-रुपये व नंतर तडजोडीअंती २० हजार -रुपये लाचेची मागणी केली . सदर लाचेची रक्कम एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालय कक्षात स्विकारतांनाnलेखा अधिकारी रविंद्र भाऊराव जोशी (वय-५७ वर्ष)nरंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एन एन जाधव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. पो.कॉ.सचिन चाटे पथकाने केली.
