नव्या संसद भवनाच्या आज लोकार्पण
nnदिल्ली : नवीन संसद भवनाचे आज (दि.28)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विधिवत पूजा सह होमहवन मत्रोउच्चारात संपन्न होणार आहे. तामिळनाडूतील 20 , वाराणसीतील 12 पंडितांकडून ही विधिवत पूजा केली जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता होमहवनाला सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश पूजेला बसतील. त्यानंतर वैदिक पद्धतीने लोकसभेमध्ये राजदंड विराजमान केला जाईल.,दिल्ली पोलिसांच्या वतीने नव्या संसदेभोवती चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिनम बंधूंची भेट घेतली. यावेळी अधिनम संतांनी पंतप्रधानांकडे ऐतिहासिक सेंगोल सुपूर्द केला. हा सेंगोल तामिळ परंपरेनुसार रविवारी भारताच्या नव्या संसद भवनामध्ये स्थापित करण्यात येईल. 5 फूट लांब आणि आणि 800 ग्रॅम वजनाचा हा सेंगोल न्यायाचे प्रतीक आहे. तामिळ परंपरेमध्ये सेंगोलचा अर्थ संपदेने संपन्न असा होतो. त्याच्या शीर्षस्थानी नंदीची प्रतीमा आहे.nसकाळी 8:30 ते 9:00:लोकसभेत राजदंडाची स्थापनाnnसकाळी 9:00 ते 9:30 पंडित, सांधूसंतांच्या उपस्थितीत प्रार्थनासभाnnदुपारी 12:00 वाजता:राष्ट्रगीतानंतर दुसर्या टप्प्यातील कार्यक्रमnnदोन लघुचित्रपट दखवले जाणारnराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशांचे वाचन.nnराज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांचे भाषणnnलोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला संबोधीत करणारnnपंतप्रधान मोदी भाषण करतील.
