October 8, 2026

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले

0

nnनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवाजी चुंभळे गटाने अर्ज दाखल न केल्याने निवडणुक बिनविरोध झाली. त्यांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले.nnबाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार असून ३० वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली असल्याचे पिंगळे म्हणाले, तर आता भ्रष्टाचारमुक्त कारभार करा, असे स्पष्ट सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू, असे चुंभळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *