October 8, 2026

पंचवटी पोलिस ठाण्याकडील फायरिंगच्या गुन्हयातील संशयितांच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

0

 nnnnनाशिक : पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीnपंचवटी पोलीस स्टेशन कडील गुरनं १२५ / २०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६ (२), ३४, सह शस्त्र अधिनियम ३ / २५, ४/२५ सह मपोका कलम १३५, १४२ प्रमाणे दाखल गुन्हयात निष्पन्न ४ आरोपीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश आज दिले.nसंशयित विशाल चंद्रकांत भालेराव व सहकारी सदस्य १) विकास उर्फ विक्की विनोद वाघ, २) जय संतोष खरात, ३) संदिप रघुनाथ आहीरे आदीनी विशाल भालेराव हा हददपार असतांना देखील दिनांक ११मार्च २०२३ रोजी रात्री २०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रेम दयानंद महाले व त्याचा मित्र युवराज शेळके असे फुलेनगर, पेठरोड तीन पुतळ्याजवळ, पंचवटी नाशिक येथे उभे असतांना विशाल भालेराव व त्याचे साथीदार यांनी हातात लोखंडे कोयते घेवुन विकास उर्फ विक्की वाघ याने त्याचे हातात गावठी बनावटीचा कटटा (पिस्तोल) हे प्राणघातक हत्यार घेवुन काहीएक कारण नसतांना फिर्यादी प्रेम महाले यांना जिवेठार मारण्याच्या उददेश्याने त्यांच्याकडील प्राणघातक हत्यारानिशी हल्ला केला.nnसदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील मुख्य संशयित आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार विशाल चंद्रकांत भालेराव (वय ३२, रा. मुंजाबाबा गल्ली, तीन पुतळयाचे मागे, शेषराव महाराज चौक, फुलेनगर पंचवटी नाशिक) हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार १) विकास उर्फ विक्की विनोद वाघ, वय २५ वर्षे, रा. मरिमाता मंदिराचे मागे, पाठकिनारी फुलेनगर, पंचवटी नाशिक २) जय संतोष खरात, वय १९ वर्षे, रा. संदिप लॉन्ड्री जवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी नाशिक ३) संदीप रघुनाथ आहीरे, वय- २० वर्षे, रा. संदिप लॉन्ड्री जवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी नाशिक यांचे सोबत मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली . एकटयाने किंवा संघटीत रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील पंचवटी, उपनगर परिसरात लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगुन धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडयाचा प्रयत्न करणे, लोकांची लुटमार मारणे, अनाधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणीचे प्रकार करणे, हप्ते गोळा करुन परिसरात दहशत निर्माण केली आहे. मुख्य संशयित आरोपी विशाल चंद्रकात भालेराव या टोळी प्रमुखाने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने एकटयाने व संयुक्तपणे हिंसाचाराचा, अवैधnशस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन आर्थीक फायदयासाठी हप्ते गोळा करणे तसेच परिसरात |nवर्चस्व निर्माण करून खंडणी वसुल करणे याप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवलेले आहे. सदर टोळीतील सदस्यांविरुध्द एकूण ११ गुन्हे पंचवटी, व उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले आहेत.nnवरील गुन्हयातील टोळी प्रमुख व सदस्य क. १ ते ३ यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्यांचेविरुध्द संघटीत रित्या गुन्हा केला असल्याने मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयातील आरोपीविरुद्ध कठोर कारवाई होणेकरीता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३ (१) (1), ३(२), ३(४), ३(५) ही वाढीव कलमे लावुन मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग शहर यांचेकडे सोपविण्यात आला आहे.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *