August 9, 2026

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

0

 nnnnनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल रविवारी (दि. २८) सकाळी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.nया सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया द्विटद्वारे दिली. आजचा दिवस हा संपूर्ण देशवासीयांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ही भव्य आणि दिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या,समृद्धीला आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल.nnनव्या संसद इमारतीत पंतप्रधान मोदींनी आपले पहिले भाषण केले. ते म्हणाले की, नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. याnवास्तूमध्ये संस्कृती आहे. तसेच संविधानाचा आवाज आहे. ही इमारत नसुन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतातील जनतेने संसदेची ही नवी इमारत आपल्या लोकशाहीला भेट म्हणून दिली आहे. भारत हा केवळ सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश नाही, तर लोकशाहीची माताही आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हा आपला संस्कार, विचार आणिnपरंपरा आहे. ही नवी वास्तू आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *