मुलीचं अपहरण केलेच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार
nसिन्नर : मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इथं घडली. ज्या तरुणानं मुलीचं अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.nरविवारी दुपारी निवृत्ती खातळे हे पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे आणि मुलीसह भरविहिर गावाकडं जात होते. रस्तात घोटी हायवे जवळ वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर यांनी साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवत. मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले.nएकतर्फी प्रेमातून आपल्या 19 वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं निराश झालेल्या खातळे दांपत्यानं भगूर येथील नूतन शाळेमागे असलेल्या रेल्वे रुळावर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली . या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून तर मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत संशयित झनकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काल सकाळी भरविहिर येथील गावकरी व नातेवाईकांनी खातळे दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
