चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
nnचंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने आज पहाटे निधन झाले. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतीम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नाही. बाळू धानोरकर यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी उपचारासाठी नवी दिल्लीत पाठवण्यात आले होते. आज सकाळी एअर ambulane नी त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात येईल. संध्याकाळी वरोरा येथे अंतिम संस्कार होणार आहे.nचंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव.nnकिडनी संबंधी आजाराशी झुंज देत असलेले चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचार सुरू असताना निधन झाले . त्यांची प्रकृती सुधारणा होत असल्याचे काल सांगण्यात येत होते, मात्र पहाटे ती अधिक खालावली, त्यांचे कुटुंबीय पण दिल्लीत त्यांच्या सोबत होते, त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर,2 मुले असा परिवार आहे, त्यांचे पार्थिव आज दुपारी वरोरा येथे आणण्यात येणार आहे.nकाँग्रेस मध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेचे आमदार होते, मात्र मागील पंचवार्षिक ला त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांना काँग्रेस प्रवेश फायदेशीर ठरवून ते लोकसभेत पोचले होते, त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे,
