मनपा शिक्षण अधिकारी सुनिता धनकर यांना पन्नास हजाराची लाच घेतांना ताब्यात
nनाशिक : तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था यातील तक्रारदार यांना सेवेमध्ये दाखल करून घेत नसल्याने त्यांनी यातील आलोसे क्रमांक एक यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्याकरिता यातील आलोसे क्रमांक 1 यांनीnप्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा नाशिकnसुनिता सुभाष धनगर ( वय- 57 वर्ष ) यांनी सदर बाबत पत्र देणे कामी ५० हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच आलोसे क्रमांक 2 यांनीnनितीन अनिल जोशी (वय- 45 वर्ष, राहणार- फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक ( वर्ग -३ ) सदरील पत्र बनवण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव , पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे आदीच्या पथकाने केली.
