लग्न लावत नवरदेवांची फसवणूक नववधू पोलिसांच्या ताब्यात
nनाशिक : लग्न लावून नवरदेवांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लग्नानंतर सासरचे दागदागिने-रोकड घेऊन नववधू पसार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळ्या देखील आता सक्रिय झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.nनाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आसलेल्या उत्राणे येथील विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांना फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाने लग्न झालेल्या ‘पत्नी’ला थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. या नववधू आणि संशयितांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nलग्नानंतर नववधूने लगेचच आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली, तसेच मधुचंद्रासाठी देखील नकार दिला यावेळी प्रवीणला संशय आल्याने नववधूकडे विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी तिने तिने संपूर्ण हकिगत सांगितली.nयापूर्वी बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हृषीकेश आणि साक्री तालुक्यातील काळगाव येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाल्याचे तरुणींने सांगितले हे ऐकल्यानंतर प्रवीणला धक्का बसला. विवाह झाल्यावर दोनच दिवसात दागिने घेऊन जात असल्याचे तिने प्रवीणला सांगितले. त्यानंतर थेट प्रवीण यांनी तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले. आतापर्यंत या टोळीने 15 ते वीस बनावट लग्न लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी प्रवीण यां दिलेल्या तक्रारीवरून विजय रामभाऊ मुळे, पूजा वडील असल्याची बतावणी करणारा एक अनोळखा इसम, अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
