August 9, 2026

पाच हजारांची लाच स्वीकारताना परीक्षक ताब्यात

0

nनाशिक : तक्रारदार यांची पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप ची अंतिम परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण 8 विद्यार्थ्यांना आलोसे हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देतात . त्यांना त्रास न देता सहकार्य करण्यासाठी आलोसे हे तक्रारदार यांचेकडे प्रत्येक विषयासाठी 100/- रू असे एकूण 9 विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे 900/- रू असे एकूण 7 हजार 200/- रुपयाची लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी अमळनेर येथे दिलेल्या तक्रारीवरून तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती 5 काजल 600/- रु ची लाचेची मागणी करून त्यापैकी तक्रारदार यांनी दिलेली 5 हजार रुपये रक्कम लाच स्वीकारताना बहिस्थ परीक्षकnविजय गुलाबराव पाटील (वय 50 वर्ष बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जळगाव) रंगेहात पकडण्यात आले. अमळनेर पो स्टे येथे रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . पोलीस उप आधीक्षक, ला.प्र.वि.नासिक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेन्द्र गिते, संदीप बत्तिसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे ला.प्र.वि.नासिक पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *