माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आढावा
nnराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर येथे भव्य मेळाव्याचे आयोजनnn
nnनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने नगर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहेत.nnराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रवादी भवन नाशिक येथील कार्यालयात नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.nnयावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार शिवराम झोले, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,महिला पदाधिकारी कविता कर्डक,संजय खैरनार,समाधान जेजूरकर, सचिन पिंगळे, गौरव गोवर्धने, ऐश्वर्या गायकवाड, मधुकर मौले, सुरेश आव्हाड, डॉ.अमोल वाजे, बाळासाहेब मते, शैलेश ढगे, जगदीश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.nnयावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे हात अधिक बळकट करण्याची आपल्याला मोठी संधी आहे. त्यासाठी नगर येथे होत असलेला पक्षाचा मेळावा अधिक भव्य व यशस्वी करण्यासाठी मेळाव्यात सर्वाधिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील असायला हवे. पक्षाची विविध पदे भूषविणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मेळाव्यासाठी योगदान द्यावे. महिला पदाधिकाऱ्यांचा देखील या मेळाव्यात सहभाग असावा असे त्यांनी यावेळी सांगितले.nnते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून १० आमदार निवडून देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या सर्वांना कधीही निवडणुका झाल्या तरी सदैव तयार असायला हवं. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक योगदान द्यावे असे आवाहन करत देशात महापुरुषांची बदनामी करण्यात येत आहे. या विरोधात आपण जागरूक राहून लढा दिला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगतिले.nnयावेळी वंसत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब भवर, गोरख बोडके, अरुण पाटील, विनोद शेलार, डॉ.योगेश गोसावी, गौरव वाघ, मुख्तार शेख, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, जीवन रायते, मुजाहिद शेख, असिफ जानोरीकर, बाळासाहेब जाधव, रतन काळे, सुरेखा निमसे, राजश्री पहिलवान, प्रशांत खरात, समाधान तिवडे, नदीम शेख, नियमात शेख, दादा कापडणीस, योगेश दिवे, राजेंद्र शेळके, शशिकांत पवार, प्रविण महाजन, प्रफुल्ल पाटील, दादा कापडणीस, आबा आमले, नाना पवार, प्रकाश पवार, गौतम पगारे, सागर लामखेडे, नईम शेख, मिलिंद पगारे, राजेश भोसले, इस्माईल पहिलवान, सागर मोटकरी, विक्रम कोठुळे, डॉ. संदीप चव्हाण, नितीन निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, रियान शेख, रामदास मेदगे, संतोष भुजबळ, अक्षय पाटील,डॉ.कल्पना शिंदे,मेघा दराडे, पुष्पा राठोड, योगिता पाटील, रंजना गांगुर्डे, संगीता पाटील, अनिता जाधव, अपेक्षा अहिरे, वसंत पवार, पोपटराव जेजुरकर, संकेत निमसे, सचिन जगझाप, दत्ताजी वामन, आसिफ मुलाणी, अक्षय परदेशी, ज्योती भोर, मंगल मोरे, निर्मला सावंत, माधुरी एखंडे, आशा भंदुरे, हर्षली मोहिते, विनोद डोके, हरीश महाजन, राकेश कांबळे, विलास वाघ, गणेश खोडे, मनिषा घोडके,आकाश कदम, रामेश्वर साबळे, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव माढवड, अक्षय खोतकर, सुरेखा नागरे, योगेश निसाळ, आकाश घुगे, विनोद शेलार, सुदाम दवडे, राजाराम निगळ, छगन भंदुरे, शंकरभाई मंडलिक, राजेंद्र जाधव, प्रशांत गांगुर्डे, किरण शिंदे, अमर वझरे, बाळासाहेब गाढवे, रतन जाधव, देविदास शिंदे, रविंद्र धुर्जड, प्रशांत आवारे, रोहित काचले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
