खंडणी विरोधी पथकाची कामगिरी जबरी चोरीच्या गुन्हयातील पाहीजे असलेला संशयित ताब्यात
nनाशिक : आडगांव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. १४९ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दि. १७/श में २०२३ रोजी १२.२७ वा. गुन्हयातील पाहिजे असलेला संशयित आरोपी रविंद्र दिलीप गांगुर्डे हा गुन्हा घडल्या पासुन पसार झालेला होता.nत्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे नुमद गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पाहीजे . नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथे येणार असल्याची पो. अंमलदार २२१८ / विठ्ठल चव्हाण यांना खात्रीशिर बातमी मिळाली होती.nखंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन पाहिजे संशयित आरोपी रविंद्र दिलीप गांगुर्डे, वय ३५ वर्षे, व्यवसाय- पेंन्टींग कॉन्ट्रॅक्टर, रा. बिल्डींग नंबर २, रूम नंबर ६३, निलगीरी बाग, यश लॉन्स समोर, औरंगाबाद रोड, नाशिक यास नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगांव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.nnसदरची कामगीरी खंडणी विरोधी पथकातील सपोनि. प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि. दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, पो.हवा. किशोर रोकडे, राजेश भदाने, | पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर पो. अंमलदार विठ्ठल चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.
