30 हजारांची लाच स्वीकारताना वायरमन ताब्यात
nनाशिक : तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे शेता जवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत असल्याने वायरमन यांने शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसून देण्याचे मोबदल्यात 30, हजार /- रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात 2 हजार रुपये असे एकूण 32 काजल रुपये बुधवारी ( दि 7) रोजी लाचेची मागणी करून तरजोडी अंती 30 हजार रुपये स्वीकारतांना हेमंत विठ्ठल खैरनार उर्फ पप्पू (पद- वरिष्ठ तंत्रज्ञ, नेम. विदयुत उप केंद्र, जोरण, ता. सटाणा, जि.नाशिक) रंगेहात पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक साधना इंगळे ,पो.हवा.सचिन गोसावी,nपो.हवा. प्रफुल्ल माळी, पो.हवा. विनोद पवार आदींच्य पथकाने केली.
